Pimpri : मोशी उपबाजारात बटाट्याची विक्रमी आवक

पिंपरी : मार्गशिर्ष महिन्यातील उपवास व्रत व लगनसराईमध्ये मागणी असल्याने मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात बटाट्याची 1,517 क्विंटल एवढी विक्रमी आवक झाली. थंडीमुळे भाजीपाल्याची एकून आवक वाढली असून, यामध्ये फळभाज्यांची 4283 क्विंटल तर पालेभाज्यांची 56,800 गडड्या एवढी आवक झाली. तर फळांची 436 क्विंटल आवक झाली.
थंडीमुळे भाजीपाल्याची आवक वाढली आहे. बटाट्याच्या खालोखाल टोमॅटोची 553 क्विंटल आवक झाली किरकोळ बाजारात टोमॅटोचा 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दर होता. फल्लॉवरची 318 क्विंटल आवक झाली असुन, गडड्याच्या आकारमानानुसार 20 ते 40 रुपयांना फ्लॉवरच्या गडड्याचीविक्री होते आहे. मटारची आवक 100 क्विंटल होऊनही प्रतीकिलोचा दर 80 ते 100 रुपयांवर स्थिर आहे. गाजराची 159 क्विंटल आवक झाली असून, प्रतिकिलोचा दर 40 ते 50 रुपये आहे.
भेंडीची 71 क्विंटल आवक झाली असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 50 ते 6 रुपये होता. गवारीची अवघी 18 क्विंटल तर पावट्याची अवघी 11 क्विंटल आवक झाली आहे. याशिवाय मिरचीची 164 क्विंटल आवक होऊनही दरातील तेजी कायम आहे. काकडीची199 क्विंटल आवक झाली असून प्रतवारीनुसार 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. कांद्याची413 क्विंटल आवक हऊनही दर कमी झालेले नाहीत. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार 40 ते 60 रुपये प्रतिकिलो दराने कांद्याची विक्री होत आहे. कोबीची 190 क्विंटल आवक झाली असुन, गड्ड्याच्या आकारमानानुसार 30 ते 40 रुपयांना प्रति नग विक्री होत आहे. चंपाषष्ठीमुळे सुरू झालेली आवक कायम असुन आज बाजारात 107 क्विंटल वांग्याची आवक झाली.
आल्याची 48 क्विंटल, घेवडा 47 क्विंटल, दोडका 29 क्विंटल, दुधी भोपळा 56 क्विंटल, डांगर 33 क्विंटल, कारली 11 क्विंटल, पडवळ 20 क्विंटल, ढोबळी 36 क्विंटल, वाल 11 क्विंटल, चवळी 3 क्विंटल, मका कणीसची 82 क्विंटल तर लिंबाची 45 क्विंटल आवक झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची 23, 900 मेथी 19,600 गड्डया, पालक 5700 गड्ड्या, पुदिना 2800 गड्डया, कांदापात 1400 गड्डया, हरभरा 1300 गड्डया, मुळा 1100 गड्डया तर शेपूची 1000 गड्डया आवक झाली.





