पिंपरी | मोशी उपबाजारात पालेभाज्या तसेच फळभाज्यांची आवक वाढली

पिंपरी, (प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यांमध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच फळभाज्यांची आवकही वाढलेली आहे. आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दरामध्येही किंचित घसरणर झालेली दिसत आहे.
सध्या पितृ पंधरवडा सुरु असल्याने सध्या पालेभाज्यांचे दर सुध्दा तेजीत आहेत. आवक वाढली असली तरी सध्या किरकोळ बाजारात दिवसामागे भाज्यांचे दर कमी-जास्त होताना दिसून येते आहे. पिंपरी-चिंचवड व पुण्यामध्ये नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतून आणि जुन्नर, नारायणगाव, मंचर तालुक्यांतून शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होते.
मोशी उपबाजार समितीत रविवारी (दि. २२) रोजी ३९,७५० गड्डी पालेभाज्यांची, तर क्विंटल फळभाज्यांची ४,३२४ तर २७९ फळे आवक झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोशी उपबाजारात पालेभाज्यांमध्ये तसेच फळभाज्यांमध्ये आवक वाढल्याची दिसून येत आहे. तर फळाची आवक स्थिर आहे.
चिंचवड येथील भाजी मंडईतील किरकोळ बाजारातील दर – शेवगा ६० ते ८०, दोडका ४० ते ६०, वाटाणा १५० ते २००, तोंडली ६० ते ८०, वांगी ४० ते ६०, गवार १२० ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
पालेभाज्या दर – (प्रति जुडी रुपयांत) मेथी ३० ते ४०, कोथिंबीर २० ते ४०, मुळा ३० ते ४५ कांदापात २० ते ३०, शेपू ३० ते ४०, पालक ३० ते ४० लहान मोठ्या जुडी नुसार.
मोशी उपबाजारातील आवक (क्विंटलमध्ये)
पालेभाज्या – ३९,७५० गड्डी, फळे २७९ क्विंटल आणि फळभाज्यांची आवक ४,३२४ क्विंटल झाली. यामध्ये कांदा ६४७, बटाटा ९७७, लसूण ०८, आले ६६, भेंडी १७०, गवार ३३, टोमॅटो ४६४, मटार ०५, घेवडा ४५, दोडका २०, मिरची १७३, भोपळा १२६,
भुईमुग शेंग ६०, काकडी २२४, कारली ९१, डांगर ७७, गाजर ९२, फ्लॉवर २२०, कोबी ३४५, वांगी १५७, ढोबळी ४७, बीट १८, शेवगा १९, चवळी १४, कडीपत्ता १४, लिंबू ३९, मका कणीस १०८ क्विंटल आवक झाली आहे. तर कोथिंबीर २५,९००, मेथी २,३५०, शेपू ८००, कांदापात १,८००, पालक ६,०००, मुळा ००, चवळी १,०००, राजगीरा ००, पुदिना १,७०० आळू २०० गड्डी आवक झाली आहे.





