Gold and Silver Rate : गेल्या १५ दिवसांपासून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरांवरही होत आहे. मागचे सलग तीन दिवसांत सोन्याचा भाव घसरला असून, १४ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३६,५०० रुपये प्रति १०० ग्रॅम आणि ३,६५० रुपये प्रति तोळा एवढा भाव स्वस्त झाला आहे. आज चांदीचा भाव देखील घसरला आहे. राज्यभर चांदीचा भाव २७५००० रुपये इतका आहे.Gold and Silver Rate मागच्या १० दिवसांत चांदीचा भाव फक्त एकदाच १० हजार रुपयांनी वाढला होता तर एकूण ३ वेळा त्यात घसरण झाली व बाकीचे दिवस स्थिर होता. हेही वाचा : Baramati : बारामती नगरपालिकेत ‘महिला दिन’ उत्साहात साजरा; कायदेशीर प्रबोधन आणि सक्षमीकरणावर भर Goodreturns च्या आकडेवारीनुसार सध्या राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे प्रति ग्रॅम १५९८१ रुपये आहे तर प्रति १० ग्रॅम १५९८१० रुपये इतका असून कालच्या तुलनेत आजच्या भावात १५३० रुपयांची घसरण झाली आहे. Gold and Silver Rate Gold and Silver Rate आज राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, नाशिक व इतर शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा सुमारे १५९६६० रुपये आहे. तर 22 कॅरेटचा भाव प्रति १० ग्रॅम १४६५०० रुपये इतका आहे आणि १८ कॅरेटचा भाव प्रति १० ग्रॅम ११९८९० रुपये इतका आहे. Gold and Silver Rate हेही वाचा : Baramati : बारामती नगरपालिकेत ‘महिला दिन’ उत्साहात साजरा; कायदेशीर प्रबोधन आणि सक्षमीकरणावर भर