राज्यातील 3 IPS अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर; उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

उद्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस पदकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशिष्ट सेवेसाठी महाराष्ट्राला 3 राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहेत. आयपीएस चिरंजीवी प्रसाद, राजेंद्र दहाले आणि एसीपी सतीश गोवेकर यांचा विशेषसेवेसाठी सन्मान करण्यात येणार आहे. तसेच हाराष्ट्राला 17 गॅलेंट्री मेडेल आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 पदक जाहीर करण्यात आली आहेत. उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये दिलं जातं शौर्य पदक
लष्कर, पोलीस : सशस्त्र दलातील जवानांनी लढाईत किंवा इतर लष्करी कारवायांमध्ये असामान्य शौर्य दाखविल्याबद्दल पुरस्कृत केलं जातं.
परमवीर चक्र- सर्वोच्च लष्करी बहुमान पुरस्कार आहे. युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी मरणोत्तर हा पुरस्कार दिला जातो. मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिलं परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं.
महावीर चक्र – . परमवीर चक्रानंतरचा हा दुसरा सर्वौच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार सैनिकांना त्यांचा युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी देण्यात येतं. हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जातो.
वीर चक्र- एखाद्या जवानाला युद्धात वीरमरण येतं अशावेळी त्याचा वडिलांना किंवा पत्नीला हा पुरस्कार देऊन सैनिकांच्या शौर्याचा सन्मान केला जातो.
अशोक चक्र- शांततेच्या काळात दिला जाणारा हा शौर्य पुरस्कार आहे. युद्धात अतुलनीय शौर्य, साहस आणि बलिदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
कीर्ती चक्र- असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान सैनिक आणि गैर-सैनिकांना दिला जातो.
नागरी शौर्य पदक: गैर-लष्करी किंवा पोलीस क्षेत्राव्यतीरिक्तल अडचणीत सापडलेल्यांचा जीव वाचवणे, गुन्हेगारी रोखणे किंवा नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे यासारख्या साहसी कृत्यांसाठी नागरिकांचा सन्मान केला जातो.





