रशियामध्ये पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणुका ? 13 मार्चला निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली – रसियाच्या (Russia) अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी मार्च महिन्याच्या 13 तारखेला निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ शकतात, असे रशियातील सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. निवडणुका जाहीर केली जाण्याची तारीख पूर्वी 17 मार्च निश्चित केली गेली होती. मात्र त्यामध्ये बदल करून आता 13 मार्चला निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकते, असे या वृत्तसंस्थेने संसदेतील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. (international marathi news)
अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा उतरण्याची आपली भूमिका विद्यमान अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी आगोदरच जाहीर केली आहे. जर पुतीन पुन्हा रशियाचे अध्यक्ष (Russia Elections) झाले तर किमान 2030 अखेरपर्यंत ते रशियाचे अध्यक्ष असतील. मात्र त्यांच्या कार्यकाळातील घडामोडी पाहता हे दशक रशियाच्या भविष्यातील सर्वात जास्त अनिश्चितता असलेले असेल असे म्हणता येऊ शकेल.
रशियामध्ये मार्च महिन्यात अध्यक्षीय निवडणुकांची घोषणा केली जाण्याची जरी शक्यता असल्यामुळे या दॉष्टीने तयारीला वेग आला आहे. मात्र त्याबाबतचा धिकॉत निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे या निवडणुकांची घोषणा जोपर्यंत अधिकॉतपणे केली जात नाही, तोपर्यंत त्याबद्दल कोणतीही व्याच्यता न करण्याचे धोरण सरकारी सूत्रांनी पाळले आहे.
रशियामध्ये अध्यक्ष पुतीन यांनी आप्लया विरोधकांना संपवण्यासाठी वेगवेगळे पर्याय स्वीकारले आहेत. वॅगनर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझीन आणि ऍलेक्सी नवालनी यांचची उदाहरणे पाहता जरी निवडणुका जाहीर झाल्या तरी पुतीन यांना आव्हान देण्यासाठी कोणी तयार होईल, याची शाश्वती देता येत नाही.





