अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार? ; नाव मागे घेण्याची करणार घोषणा ?

President Joe Biden । अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीतुन सध्याचे राष्ट्राध्यक्ष असणारे आणि या निवडणुकीत उतरणारे जो बायडन माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या हवाल्याने याविषयीची माहिती समोर आलीय.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात. स्थानिक पत्रकार मार्क हॅलपेरिन यांनी याविषयी, अध्यक्ष जो बायडन यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून पायउतार होण्यास सहमती दर्शविली असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याच बरोबर त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे. बायडन हॅरिस यांच्याशिवाय अन्य कोणत्याही उमेदवारासाठी खुल्या प्रक्रियेला पाठिंबा देतील, ज्यामुळे काही इतर उमेदवारांसाठी मार्ग मोकळा होईल” असे बायडन यांचे मत आहे.मात्र, कमला हॅरिस यांची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून निवड केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर आवाज उठू लागले President Joe Biden ।
नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांचा जो बायडन यांच्यावर वरचष्मा होता. यानंतर जो बायडन यांच्या तब्येतीवर आणि खराब कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. आता जो बायडन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्याची घोषणा करू शकतात. इंग्रजी वर्तमापत्राने आपल्या अहवालात म्हटले आहे की, त्यांच्या जवळच्या लोकांचा असा विश्वास आहे की बायडन यांनी आता नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका जिंकण्याची त्यांची क्षमता नाही, असे त्यांनाही वाटू लागले आहे.
हॅरिसकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पर्याय शोध सुरु
इंग्रजी वर्तमापत्राने आपल्या अहवालात म्हटले आहे की, डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते की बायडन आता मागे हटतील. दोनच दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही यावेळी बायडन यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचे म्हटले होते. तर वॉशिंग्टन पोस्टने आपल्या वृत्तात, गुरुवारी रात्रीपर्यंत अशी अटकळ होती की बायडन कधीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करू शकतात.असे म्हटले होते. तर त्याचवेळी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेने उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केलीय.
गोळीबाराचा फायदा ट्रम्प यांना मिळेल President Joe Biden ।
तर या सर्व घडामोडीत नुकतेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे अमेरिकन जनतेची मते सहानुभूतीच्या रूपाने ट्रम्प यांच्या पारड्यात पडू शकतात, असे अमेरिकेतील राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळेच बायडेनच्या विजयाची शक्यता बरीच कमी झाली आहे.





