राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभ मेळ्यात उपस्थित; त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान

President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात पोहचल्या. यावेळी त्यांनी त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान केले. स्नानानंतर त्यांनी गंगेला नमन केले आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टर विमानतळावर उतरले. जेथे राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून ती एरेलला पोहोचली, बोटीवरुन सीएम योगी आणि राज्यपाल यांच्यासमवेत संगमावर पोहोचल्या. त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पूजा-अर्चना देखील केली. यानंतर त्या डिजिटल महाकुंभ अनुभव केंद्राला भेट देतील. ज्यामध्ये महाकुंभ मेळ्याची सविस्तर माहिती टेक्निकल माध्यमांद्वारे उपलब्ध केली जात आहे. याशिवाय त्या हनुमान मंदिरात पूजा आणि दर्शन घेतील.
#WATCH | Prayagraj, UP: President Droupadi Murmu, Uttar Pradesh Governor Anandiben Patel, and UP CM Yogi Adityanath arrive at Triveni Sangam.
President Droupadi Murmu will soon take a holy dip at Sangam pic.twitter.com/WYepcGDUiy
— ANI (@ANI) February 10, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्रिवेणी संगमात अमृतस्नान
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 5 फेब्रुवारी त्रिवेणी संगमात अमृतस्नान केले. भगवे रंगाचे कपडे परिधान करून, हातात रुद्राक्षांची माळ घेऊन पंतप्रधान मोदींनी स्नान पवित्र स्नान केले होते.
प्रयागराजमध्ये भक्तांची मोठी गर्दी
मौनी अमावास्यानंतर पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये भक्तांची गर्दी वाढत आहे. रस्त्यांपासून रेल्वे स्थानकांपर्यंत बरीच गर्दी आहे. शहराबाहेर आणि बाहेरील अनेक किलोमीटरच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे जगभरातून सध्या लोक येथे भेट देत असल्याचे दिसत आहे. महाकुंभ सुरू झाल्यापासून म्हणजेच १३ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत ४३.५७ कोटींहून अधिक लोकांनी संगमात पवित्र स्नान केले.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १४४ वर्षांतून एकदाच येणाऱ्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी पवित्र स्नान केले. पौष पौर्णिमेला सुरू झालेला महाकुंभ २०२५ हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे, जो जगभरातील भाविकांना आकर्षित करतो. हा महाकुंभ २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा:




