President Speech | देशभरात नीट परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील संशियातांना देखील ताब्यात घेतले जात आहे. यातच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या अभिभाषणात संसदेच्या दोन्ही सभागृहांना एकत्रितरित्या संबोधित करताना या मुद्द्यावर सरकारच्यावतीने भूमिका मांडली. भाषण सुरू करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचे कौतुकही केले. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशकांचा विक्रम मोडीत काढत मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केले याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसेच भारताच्या लोकांनी सलग तिसऱ्यांदा स्थिर आणि स्पष्ट बहुमताचं सरकार बनवले असल्याचे राष्ट्रपतींनी म्हणताच विरोधकांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. आणीबाणीवर भाष्य President Speech | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणीबाणीला भारतीय संविधानावरील सर्वात मोठा आघात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “1975 मध्ये आणीबाणी लागू झाली तेव्हा देशात हाहाकार माजला होता आणि त्या काळात लोकशाहीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आपल्या लोकशाहीला हानी पोहोचवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. फुटीरतावादी शक्ती लोकशाही कमकुवत करण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे कारस्थान देशांतर्गत आणि देशाबाहेर करत आहेत.” “आणीबाणी हा राज्यघटनेवर थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश अंधारात बुडाला होता पण अशा असंवैधानिक शक्तींचा पराभव करण्यात देश यशस्वी झाला होता. आजचा काळ भारतासाठी अनुकूल आहे आणि राज्यघटना आपल्यासाठी जनजागृतीचा एक भाग आहे,” असेही त्या म्हणाल्या. President Speech | पुढे त्या म्हणाल्या, “धोरणांना विरोध करणे आणि संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणे या वेगळ्या गोष्टी आहेत. संसदेनं देखील परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांविरोधात एक कठोर कायदा केला आहे. सरकार परीक्षांशीसंबंधित संस्था, त्यांच्या कामकाजाचे प्रकार, परीक्षा संबंधिची प्रक्रिया यामध्ये मोठी सुधारणा करण्याच्या दृष्टीनं काम करत आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच पेपरलीकच्या घटनांची निप्षक्ष चौकशी करून दोषींना कडक शिक्षा देण्यासाठी सरकार कटबद्ध असल्याचेही त्यांनी म्हंटले. हेही वाचा: “आळस मला आलेला… “; विद्या बालनचा मराठी रॅपसॉंगवरील व्हिडिओ तुफान व्हायरल