राजधानीत स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी वेगात

नवी दिल्ली – स्वांत्र्यदिनाच्या सोहोळ्याची तयारी राजधानी दिल्लीत वेगाने सुरू करण्यात आली आहे. करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त काळजी घेण्यात येत आहे. लाल किल्ल्यार्वील कार्यक्रमात सहभअगी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
स्वातंत्र्या दिनाला ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करत असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या जवळपास असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची 13 ऑगस्टला करोना चाचणी करण्यात येणार आहे. ज्यांना अद्याप लस दिली नाही त्यांना लस देण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही मर्यादित आसन व्यवस्था असेल. पंतप्रधानांच्या सभोवती बसणाऱ्यांसाठी दोन यार्ड अंतर ठेवून आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वातंत्र्या दिनाला एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, त्यांची संख्याही नियंत्रीत ठेवण्यात येणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणऱ्या खेळाडूंना पंतप्रधानांच्या जवळ बसण्याचा सन्मान देण्यात येणार असल्याचे समजते. त्यांच्या आगमन आणि जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग राखून ठेवण्यात येणार आहे.
सुरक्षा व्यस्था कडेकोट ठेवण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी सुमारे 15 ते 20 वाहने लाल किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर बंदोबस्तासाठी ठेवली आहेत. सुरक्षा यंत्रणांना यापुर्वी 15 ऑगस्टसाठी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वातंत्र्या दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी कडकोट बंदोबस्त सुरू केला आहे. या शिवाय ड्रोनप्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा ड्रोन लाल किल्ल्याच्या परिसरात येऊ शकणार नाही. या यंत्रणेची कार्यक्षमता पाच किमी त्रिज्येची असते.
दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांची छायाचित्रे लाल किल्ल्याच्या सभोवती लावली आहेत. त्यांचे नाव आणि पत्त्यांचा समावेश त्यात आहे.
शेतकरी आंदोलनाची धास्ती
दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनाची सरकारला धास्ती वाटत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यातून लाल किल्ला परिसरात अनुचित घटना घडल्या होत्या. त्या घटना लक्षात ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सुरेक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून सज्ज आहेत.





