इंदापूर : गणरायाला निरोप देण्यासाठी प्रत्येक घरातून लहान थोर गणरायाचे भक्त विसर्जन कुंडाकडे, वाजत, गाजत, नाचत इंदापूर शहरात येत असतात. या गणेश भक्तांना लाडू आणि जिलबीचे वाटप इंदापूर शहरात सालाबाद प्रमाणे अनेक सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते करतात. या तयारीची लगबग इंदापूर शहरात (ता. 5 सप्टेंबर) रोजी दिवसभर सुरू असल्याचे दिसून आले. या संदर्भात दत्त जिलेबी सेंटरचे उमेश महाजन, गौरव महाजन, शेखर महाजन, लुक्का वर्मा, यांनी सांगितले की, गणरायाच्या भक्तगणांना जिलेबी लाडूचा प्रसाद इंदापुरात मोठ्या प्रमाणात वाटला जातो. याची तयारी आम्हाला दोन दिवस अगोदरच करावी लागते, यंदा पाऊस पाणी अगोदरच झाल्याने बाजारपेठेत वेगळा आनंद आहे. त्यातच गणपती बाप्पांना गोडप्रसाद दाखवून, गणेश भक्तांना प्रसादाचे वाटप करून, वेगळा आदर्श इंदापुरात पाहण्यास मिळतो. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते युवक नेते सचिन चौगुले म्हणाले, सकाळी अकरा वाजल्यापासून, लाडू जिलबी चे वाटप गणरायाच्या भक्तांना सामाजिक संस्थेतर्फे करणार आहे. याचा भक्त जणांनी लाभ घ्यावा असे आव्हान सचिन चौगुले यांनी केले.