महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी; राज ठाकरे यांनी नाशिक शहर आणि जिल्हा संघटनेत केले मोठे फेरबदल

नाशिक – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक शहर आणि जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. यात नवीन पदाधिकाऱ्यांसह 122 नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी हॉटेल एसएके सोलीटेयर येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात ही यादी जाहीर करण्यात आली. फेरबदलात नाशिक शहर अध्यक्षपदी दिलीप दातीर यांची वर्णी लागली आहे, तर अंकुश पवार यांची नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर बढती करण्यात आली आहे.

यासोबतच ऍड. रतनकुमार ईचम यांचीही जिल्हाध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. सचिन भोसले यांची शहर समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नियुक्तीत नाशिक शहरातील सहाही विभाग अध्यक्षांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यात नाशिक मध्य विधानसभा विभाग अध्यक्षपदी नितीन साळवे आणि सत्यम खंडाळे, नाशिक पश्‍चिम विधानसभा विभाग अध्यक्षपदी रामदास दातीर आणि योगेश लभडे, तर नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्षपदी भाऊसाहेब निमसे आणि विक्रम कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.