Premier League : हॅवर्टझच्या गोलने चेल्सीचा विजय
Updated On:

लंडन – प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्ययात चेल्सीने न्यूकॅसल संघाचा 1-0 असा पराभव केला व आगेकूच केली. या सामन्यात अखेरच्या काही मिनिटांपर्यंत गोलशुन्य बरोबरी झाली होती व हा सामना असाच संपणार असे वाटत असतानाच के हॅवर्टझ याने 89 व्या मिनिटाला न्यूकॅसलचा बचाव भेदला व संघाला विजय मिळवून देणार गोल केला.
प्रीमियर लीगच्या कार्यकारी मंडळाने रशायाचे प्रसिद्ध उद्योजक रोमन अब्रामोव्हिच यांना चेल्सीच्या मालकीपदावरून हटवण्यात आल्यानंतर चेल्सी संघ पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळत होता. हा त्यांचा प्रीमियर लीगमधील सलग पाचवा विजय ठरला.




