पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षकपदी प्रेमप्रकाश मीना

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी विधानसभामतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.
प्रेमप्रकाश मीनायांनी पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयास भेट दिली. त्यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी प्रत्येक कक्षाची माहिती व विधानसभा निवडणूक कामकाज विषयक कार्यपध्दती बाबत माहिती घेऊन, त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.
तसेच मतदार संघातील त्याच्या काही तक्रारी असल्यास निवारणा करिता उ-तळसळश्र रिि तसेच 020-27650901 या कशश्रि ऊशीज्ञ वर नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, निवडणूक खर्च कक्ष समन्वय अधिकारी माधुरी बांदल, आचारसहिंता कक्ष समन्वयक सुनिल भागवानी, माध्यम कक्ष समन्वयक विजय भोजणे, सुरेंद्र देखमुखे उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या प्रेमप्रकाश मीना निवासाचा पत्ता – रुम. नं. अ/103, ग्रीन बिल्डींग , व्ही. व्ही आय.पी. सर्कीट हाऊस,क्विन्स गार्डन,पुणे 411001 असा आहे
त्यांचा संपर्क क्रमांक 8999157609 व इमेल-शुिेली.लिालऽसारळश्र.लेा असा आहे. निवडणूक खर्च निरिक्षक यांचे संपर्क अधिकारी बाळासाहेब कोळेकर त्यांचा संपर्क क्रमांक 9850904627, असा आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक पिंपरी विधानसभा मतदारसंघ श्री. प्रेमप्रकाश मीना यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे


