Preity Zinta : प्रीती झिंटाचे त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान, महाकुंभाचा अनुभव सांगत म्हणाली “जीवनाच्या चक्रातून मुक्ती……”

आज प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस असून येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. गेल्या दीड महिन्यात बॅालीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कुंभला हजेरी लावत पवित्र स्नान केले. अभिनेत्री प्रीती झिंटाने मंगळवारी महाकुंभ मेळ्याला भेट दिली. अभिनेत्रीने पवित्र संगमात तिच्या आईसोबत डुबकी घेतली. तसेच येथील पवित्र तीर्थ स्थळांना देखील तिने भेट दिली. प्रीतीने कुंभमेळ्याचा अनुभव शेअर केला आहे. ही तिची कुंभमेळ्याची तिसरी भेट असल्याचे अभिनेत्रीने उघड केले. तिने या अनुभवाचे जादुई असे वर्णन केले, पण थोडे वाईटही वाटले, असे ती म्हणाली आहे.
This was my third time at the Kumbh Mela & it was magical, heartwarming & a bit sad.
Magical because no matter how hard I try, I cannot explain how I felt.
Heartwarming because I went with my mom & it meant the world to her.
Sad, because I wanted to be liberated from the various… pic.twitter.com/Y2rdAmVRgT— Preity G Zinta (@realpreityzinta) February 26, 2025
महा कुंभमेळ्याच्या भेटीचा व्हिडिओ शेअर करताना प्रीतीने लिहिले की, ‘कुंभमेळ्यात माझी ही तिसरी वेळ होती आणि ती जादुई, हृदयस्पर्शी आणि थोडी दुःखद होती. हे जादुई आहे, कारण मी कितीही प्रयत्न केले तरी मला कसे वाटले ते मी स्पष्ट करू शकत नाही. हे हृदयस्पर्शी आहे कारण मी माझ्या आईसोबत गेले होते आणि तिचा माझ्यात जीवनात मोठा अर्थ आहे. हा अनुभव थोडं दु:खी का वाटला हे सांगताना ती म्हणाली.
‘दु:ख होतं, कारण मला जीवन-मृत्यूच्या विविध फेऱ्यांतून मुक्त व्हायचं होतं, पण जीवन आणि आसक्ती या द्वैताची जाणीव झाली. मी माझे कुटुंब, माझी मुले आणि माझ्या प्रियजनांना सोडण्यास तयार आहे का? नाही! मी तयार नाही! हे माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी आहे. जेव्हा तुम्हाला हे समजते की, आसक्तीचा धागा मजबूत आणि शक्तिशाली आहे आणि तुमची आसक्ती काहीही असली तरी शेवटी तुमचा आध्यात्मिक प्रवास आणि पुढचा प्रवास एकटाच असेल, असे प्रतीने पोस्टमध्ये लिहिले आहे.
अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘मी या विश्वासाने परत आले की आपण आध्यात्मिक अनुभव घेणारे मानव नाही, तर मानवी अनुभव घेणारे आध्यात्मिक प्राणी आहोत. यापलीकडे मला माहीत नाही, पण मला खात्री आहे की, हर हर महादेव होईपर्यंत माझी उत्सुकता मी शोधत असलेल्या सर्व उत्तरांचा मार्ग निश्चित करेल, असे देखील तिने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.





