बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने शनिवारी आपल्या 31व्या वाढदिवसानिमित्त करोना व्हायरसवर लवकर लस यावी, अशी प्रार्थना केली आहे. भूमी म्हणाली, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी यावर्षी फक्त एकच प्रार्थना आहे की सर्वत्र ज्यांना विषाणूचा परिणाम झाला आहे आणि जे लोक या वेळी कठीण परिस्थितीमुळे असुरक्षित आहेत त्यांना आराम मिळो आणि आम्हाला लवकरात लवकर कोविड-19वर लस सापडो.
तसेच आपल्य वाढदिवसाच्या योजनेबद्दल भूमी म्हणाली, हा “बर्थ डे’ माझ्यासाठी एका अर्थाने खास ठरणार आहे. कारण मी कोणालाही भेटणार नाही आणि आपल्या कुटुंबासमवेत घरीच राहणार आहे. ही खूप सोपी व सरळ बाब ठरले. तरीही कोणतीही विशेष योजना नाही, असे भूमीने सांगितले.
ती म्हणाली, “खरं तर, मी वाढदिवस खूप धुमधडाक्यात साजरा करत असते. मी माझ्या मित्र-मैत्रिणींसह प्रियजनांसोबत मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करते. या दिवशी मला अनेकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतात. परंतु मला वाटते की यावर्षी मी फक्त माझ्या आई आणि बहिणीबरोबर राहणार आहे. तसेच कदाचित माझ्या आवडत्या व्यक्तींना झूम कॉलवर संपर्क करेन, असे भूमीने म्हणाली.