‘अहो विक्रमार्का’ सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित; प्रवीण तरडेच्या लुकची होतेय जोरदार चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते प्रवीण तरडे आणि तेजस्वीनी पंडीत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ॲक्शन, इमोशन्स आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याची कथा या चित्रपटात दाखवणात आली आहे. ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात देव गिल पोलिस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात धडाकेबाज ॲक्शनसीन, नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘अहो विक्रमार्का’ हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.
‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
‘अहो विक्रमार्का’ चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ५ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित, अनिल नगरकर अशा अनेक मराठी कलाकार या चित्रपटात देवसोबत दिसणार आहेत.




