प्रवेश वर्मा यांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ ; अरविंद केजरीवालांचा केला होता दारुण पराभव

Pravesh Verma । दिल्लीच्या सत्तेत तब्बल २७ वर्षांनी भाजपला बसण्याची संधी मिळाली आहे. त्यानुसार आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. दरम्यान, त्यांच्यानंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना म्हणजेच अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव करणाऱ्या प्रवेश वर्मा यांनीदेखील कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली.
रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री Pravesh Verma ।
प्रवेश वर्मा यांना उपराज्यपाल पंकज सिंह यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. २७ वर्षांनंतर राजधानीत भाजप पुन्हा सत्तेत आला आहे, त्यामुळे पक्षासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत.
प्रवेश वर्मा यांचा राजकीय प्रवास Pravesh Verma ।
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. प्रवेश वर्मा यांच्याविषयी सांगणायच झालं तर प्रवेश वर्मा हे दोन वेळा आमदार राहिले आहेत, दोन वेळा खासदार आहेत, त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला आहे, ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. ते २०१३ मध्ये मेहरौली विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.
२०१४ आणि २०१९ मध्ये दोनदा पश्चिम दिल्लीतून खासदार झाले. २०२४ मध्ये त्यांना तिकीट मिळाले नाही पण विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार झालेल्या केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर ते चर्चेत आहेत. त्यांचे काका आझाद सिंग हे उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर राहिले आहेत. त्यांच्या मंत्रीपदामुळे भाजपचे लक्ष सुमारे ८ टक्के जाट मतदारांवर आहे.
तर दुसरीकडे दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या बंदना कुमारीचा पराभव केला. रेखा गुप्ता यांनी ही जागा २९००० हून अधिक मतांनी जिंकली होती. रेखा गुप्ता यांच्यासोबत प्रवेश वर्मा, आशिष सूद, पंकज सिंग, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा आणि रवींद्र इंद्रराज या सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.





