प्रवीण तरडे म्हणाले… ‘आय हेट यू सुशांत’

मुंबई – अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अजोड कलागुणांच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ने आपला जीवनप्रवास थांबवला. मुंबईतील आपल्या निवासस्थानी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतची ही अकाली एक्झिट सर्वांच्याच जीवाला घोर लावणारी ठरली असून सुशांत आपल्यातून निघून गेला आहे हे सत्य पचवणं जड जातंय.
दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक-अभिनेते ‘प्रविण तरडे’ यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत सुशांतला आदरांजली अर्पण केली आहे.
हे दुःख मोठं आहे .. आत्महत्ये पासून सुटके साठी तु छिछोरे दिलास मग आज तूच असा का गेलास ..? I hate you Sushant bhai😭😭😭😭😭😭😭😭😭😭
— Pravin Vitthal Tarde (@WriterPravin) June 14, 2020
प्रविण तरडे म्हंटले की,” परमेश्वरा हे काय चाललंय रे.. असं का ? या सोबत सुशांतसिंह राजपूतचा फोटो शेअर केला आहे. तर ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे दुःख मोठं आहे .. आत्महत्ये पासून सुटके साठी तु छिछोरे दिलास मग आज तूच असा का गेलास ..? I hate you Sushant bhai“.





