गणपती प्रतिष्ठापनेत झालेली चूक मान्य करत प्रवीण तरडेंनी मागितली माफी; म्हणाले…

Updated On:
गणपती प्रतिष्ठापनेत झालेली चूक मान्य करत प्रवीण तरडेंनी मागितली माफी; म्हणाले…

पुणे – अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या घरच्या गणपतीच्या डेकोरेशनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं होत. आता या प्रकरणी प्रवीण तरडे यांनी माफी मागितली आहे.

याबाबत आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून आपण केलेल्या डेकोरेशनमुळे ज्यांची कोणाची मने दुखावली असतील त्या सर्वांची आपण माफी मागतो असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हंटल आहे. याखेरीज त्यांनी आपल्या घरातील ‘ते’ वादग्रस्त डेकोरेशन देखील हटवलं आहे.

काय म्हणाले प्रवीण तरडे?

“माझ्या घरी पुस्तक गणपती अशी कन्सेप्ट होती. आणि बुद्धीची देवता आणि बुद्धीच सर्वात मोठं प्रतीक अशी माझी भावना होती. परंतु ती किती मोठी चूक आहे, हे माझ्या लक्षात आणून दिलं. आरपीआय  असेल किंवा भीम आर्मी असेल, लातूरची संघटना असेल, पुण्यातल्या अनेक असतील. तर मी सर्व माझ्या दलित बांधवांची ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो. माझी चुक मान्य करतो आणि मी केलेला हा बदल तुमच्या सगळ्यांना दाखवतो. माझ्या खूप सामाजिक भावना असतात दरवेळी तुम्ही पाहिल्या असतील. आजपर्यंत कधीच चुकी झाली नाही पुन्हा कधी होणार नाही.  जगभरातील  बांधवांची माफी मागतो. माफ करा.”

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/3413504648715379/

नेमकं काय आहे प्रकरण?

प्रविण तरडे यांनी आज आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. घरच्या गणपतीसाठी तरडे यांनी पुस्तकांचे डेकोरेशन केले असून गणरायाच्या मूर्तीच्या चारही बाजूने पुस्तकं सजवली आहेत. याबाबत त्यांनी आज सकाळी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये गणेशाची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पाटाखाली देशाची राज्यघटना अर्थात संविधान ठेवले असल्याचे आढळून आले. यानंतर तरडे यांच्या या कृतीबाबत सोशल मीडियावर प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.

आपली चूक लक्षात येताच प्रवीण तरडे यांनी सदर फोटो आपल्या सोशल मीडिया खात्यावरून तात्काळ हटवला. यानंतर त्यांनी आता याबाबत एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी सर्वांची माफी मागत डेकोरेशनमध्ये बदल केल्याचे जाहीर केले.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...