Tokyo Olympics | पदक जिंकूनच येणार – प्रवीण जाधव
Updated On:

मुंबई – आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकूनच येणार, असा निर्धार महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पात्र तिरंदाज प्रवीण जाधव याने व्यक्त केला.
सध्या कसून सराव करत असून, टोकियोतून रिकाम्या हाताने येणार नाही. पदक जिंकण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकणे आणि ऑलिम्पिक पदक जिंकणे यात प्रचंड फरक आहे. त्यामुळे माझ्यासाठी सध्या ऑलिम्पिकचे पदक जिंकणे हेच अंतिम ध्येय आहे, असेही त्याने सांगितले.





