“फिट इंडिया, हिंदू नववर्ष आणि रॅपरच्या गाण्याचा उल्लेख” ; पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मधून साधला देशवासीयांशी संवाद

PM Modi in Mann Ki Baat । आज पंतप्रधान मोदी यांनी मन कि बात या त्यांच्या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे आणि भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. १३ ते १५ एप्रिल दरम्यान, देशाच्या विविध भागात उत्सवाचा उत्साह असेल. म्हणजे हा संपूर्ण महिना सणांचा आहे. या सणांच्या निमित्ताने मी देशातील जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. ” असे म्हणून आपल्या भाषणाची सुरुवात केली.
पुढे पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात,”पावसाचे थेंब जपून आपण बरेच पाणी वाया जाण्यापासून वाचवू शकतो. गेल्या काही वर्षांत, या मोहिमेअंतर्गत देशाच्या अनेक भागात जलसंवर्धनाचे अभूतपूर्व काम झाले आहे.” अशी महत्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे पंतप्रधान म्हणाले, “मी तुम्हाला एक मनोरंजक आकडा देतो. गेल्या ७-८ वर्षांत, नव्याने बांधलेल्या टाक्या, तलाव आणि इतर स्रोतांद्वारे ११ अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आले” असल्याचे म्हटले.
पंतप्रधान मोदींनी ‘माझे भारत कॅलेंडर’ केले शेअर PM Modi in Mann Ki Baat ।
पंतप्रधान मोदी यांनी, तरुण मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत या उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या माझ्या भारताच्या खास कॅलेंडरबद्दल चर्चा करू इच्छित आहे. या कॅलेंडरमधील काही अनोखे प्रयत्न मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छित आहे. माय-भारतच्या अभ्यास दौऱ्यात, तुम्हाला आमची ‘जन औषधी केंद्रे’ कशी काम करतात हे कळेल. व्हायब्रंट व्हिलेज कॅम्पेनचा भाग बनून तुम्ही सीमावर्ती गावांमध्ये एक अनोखा अनुभव घेऊ शकता.” असे म्हटले.
प्रसिद्ध रॅपर हनुमानकिंद यांच्या गाण्याचा उल्लेख
पंतप्रधान म्हणाले, “आपले स्वदेशी खेळ आता एक प्रसिद्ध संस्कृती बनत आहेत. तुम्हाला सर्वांना प्रसिद्ध रॅपर हनुमानकिंद माहित असेलच. आजकाल त्याचे नवीन गाणे “रन इट अप” खूप प्रसिद्ध होत आहे. त्यात कलारीपायाडू, गटका आणि थांग-ता सारख्या आपल्या पारंपारिक मार्शल आर्ट्सचा समावेश आहे. दिल्लीतील एका भव्य कार्यक्रमाने लोकांना खूप प्रेरणा दिली आहे आणि त्यांना उत्साहाने भरले आहे.”अशी माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांचे फिट इंडिया कार्निव्हलवर भाषण PM Modi in Mann Ki Baat ।
‘मन की बात’मध्ये योगाचा उल्लेख करून, फिट इंडिया कार्निव्हल पहिल्यांदाच एक नाविन्यपूर्ण कल्पना म्हणून आयोजित करण्यात आला. विविध भागातील सुमारे २५ हजार लोकांनी यात सहभाग घेतला. त्या सर्वांचे ध्येय एकच होते – तंदुरुस्त राहणे आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूकता पसरवणे.” असेदेखील त्यांनी म्हटले.
पॅरा गेम्स जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन
पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमात सांगितले की, काही दिवसांपूर्वी झालेल्या खेलो पॅरा गेम्समध्ये पुन्हा एकदा खेळाडूंनी त्यांच्या समर्पणाने आणि प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित केले. यावेळी या खेळांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. यावरून पॅरा स्पोर्ट्स किती लोकप्रिय होत आहे हे दिसून येते. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी त्यांच्या उत्तम प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो.





