प्रार्थना बेहेरेच्या पायाला दुखापत; शेअर केले फोटो

Prarthana Behere | अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मालिकांसह मराठी चित्रपटांमध्ये देखील उत्तम काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. शिवाय यासह ती तिचे अनेक वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र सध्या तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे.
प्रार्थनाच्या गुडघ्याची सर्जरी झाली आहे. सोबतच फ्रॅक्चर असून तिचा पाय पूर्ण बँडेजमध्ये बांधलेला आहे. तिने इनस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमधून ती तिच्या घरी बसलेली असून सध्या शस्त्रक्रियेनंतर आराम करत असल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘पुढील काही आठवड्यांसाठी माझा विव्ह्यू. काहीही तक्रार नाही. गुडघ्याच्या लिगामेंटची सर्जरी.’ अनेक कलाकारांसह चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला दिला आहे. Prarthana Behere |
View this post on Instagram
दरम्यान, प्रार्थना शेवटचं ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून झळकली होती. आता ती अभिषेक जावकर दिग्दर्शित चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. Prarthana Behere |
हेही वाचा:
शिवसेना उबाठाची महत्वाची बैठक: महापालिकेसाठी रणनीती ठरली, आमदारांना उद्धव ठाकरेंनी दिल्या ‘या’ सूचना





