राधाबाई काळे महाविद्यालयाची प्रांजल शिर्के गणितात बोर्डात प्रथम

नगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घोषित झालेल्या बारावीच्या निकालात रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी यंदाही निकालाची उज्वल परंपरा कायम राखली. प्रांजल शिर्के हीने गणितात बोर्डात प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी दिली.
महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचा सरासरी निकाल 96.69 टक्के लागला. 439 विद्यार्थिनी बारावी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी 54 विशेष प्राविण्य व 236 प्रथम श्रेणीत विद्यार्थीनीनी प्राप्त केली आहे. कला शाखेचा निकाल 91.47 टक्के लागला असून जागृती राजेश कनोजिया 83.84 (प्रथम), सानिया सलिम आतार 83.38 (द्वितीय), ऐश्वर्या रेणुका काळे 81.69(तृतीय) असे क्रमांक मिळविले.
वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. या शाखेतून अश्विनी संजय रोकडे 90.76 टक्के (प्रथम), गायत्री भाऊसाहेब जावळे 86.76 टक्के (द्वितीय), शुभांगी अशोकंमोरे 85.84 टक्के (तृतीय), असे क्रमांक मिळविले. शास्त्र शाखेचा निकाल 98.61 टक्के लागला. या शाखेत प्रतीक्षा सुनील गिरमकर 86.61 टक्के (प्रथम), मोनिका शिवाजी लगड 84.76 टक्के, द्वितीय), आश्लेषा दत्तात्रय मेमाणे 82.61 टक्के (तृतीय), असे क्रमांक मिळविले. गणित विषयात 100 गुण मिळवून प्रांजल मछिन्द्र शिर्के ही बोर्डात प्रथम आली.
महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाबाबत महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, स्नेहल शिंदे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, डॉ. भाऊसाहेब औटी, उपप्राचार्य डॉ. मनोहर करांडे, विभाग प्रमुख प्रा. बबनराव कातोरे यांनी अभिनंदन केले आहे.





