Pranjal Khewalkar : पुण्यातील रेव्ह पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील सोसायटीत पोलिसांनी धाड टाकत रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण सात जणांना ताब्यात घेतले असून, यामध्ये ५ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. गुन्हे शाखेंच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाती होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे अटक करण्यात आलेले एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर आहेत तरी कोण? याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, या रेव्ही पार्टीचे आयोजन प्रांजल खेवलकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहेत. खेवलकर यांना अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलिसांनी मोठा अमली पदार्थाचा साठा जपत केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. कोण आहेत प्राजंल खेवलकर? प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे सक्रिय राजकारणात आहेत. मात्र, प्रांजल खेवलकर यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यांची ट्रव्हल कंपनी असल्याची माहिती आहे. रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे.