Pranit More : “चूका प्रत्येकाकडून होतात, पण…”; प्रणित मोरेला प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाठिंबा
Pranit More : या प्रकरणानंतर स्टँड-अप कॉमेडीमधील मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी प्रश्नचिन्ह

Pranit More : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या आपल्या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांपैकी हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पण्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावरून संतापाची लाट उसळली आहे.
सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली. या वादादरम्यान, अभिनेत्री कुनिका सदानंद हिनं प्रणित मोरेला पाठिंबा दिला आहे. प्रणित मोरेनं व्हिडीओ शेअर करत माफीनामा जाहीर केल्यानंतर तिनं या व्हिडीओवर कमेंट करत त्याची पाठराखण केली.
कुनिका सदानंदने कमेंट करुन म्हटलं की, ‘चूका या प्रत्येकाकडून होतात. पण त्या चूका स्वीकारण्याचं धाडस प्रत्येकाकडे नसतं. प्रणित तू एक चांगला मुलगा आहेस. तुझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. एन्टरटेनर म्हणून रोस्टिंग किंवा विनोद करताना वाहवत जाण्याची शक्यता असते. मला आशा आहे की, लोक तुला माफ करतील आणि स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल’.
‘ही मानसिकता केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेला महिलांकडे वस्तूप्रमाणे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण करणारा तू नाहीस. गॉड ब्लेस यू.. मला आशा की, तू उत्तम कंटेट घेऊन परत येशील. स्ट्राँग राहा, असं अभिनेत्रीनं प्रणित मोरेच्या पोस्टमध्ये म्हटलं.
मी त्यावर भूमिका घेण्यात चुकलो
संबंधित व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देत प्रणित मोरेने माफी मागितली. तो म्हणाला की, “त्या कार्यक्रमात संबंधित व्यक्तीने अनेक अपमानास्पद गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या वेळी प्रेक्षक त्यावर हसत होते. मात्र, या घटनेमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मीदेखील त्यात वहावत गेलो. मी त्यावर भूमिका घेण्यात चुकलो,” अशी कबुली त्याने दिली आहे. Pranit More
पुढे त्याने म्हटलं की, “मला वाटतं ही माझी खूप मोठी चूक आहे. मी हवं तर त्याला तिथेच थांबवू शकलो असतो किंवा भूमिका घेऊ शकलो असतो. पण मी हे करु शकलो नाही. मी त्याला एक प्लॅटफॉर्म दिला ज्यामुळे ही गोष्ट इतकी वाढली. यामुळे जे दुखावलेत त्या सर्वांची मी माफी मागतो. माझ्याविरोधात जी कायदेशीर कारवाई सुरु आहे त्यासाठी मी प्रशासनाला सहकार्य करत आहे”.
मला एक संधी द्या
“तुम्ही सर्वांनी मला एक संधी द्या. मी चांगला व्यक्ती होऊन दाखवेन. मलाही यातून शिकायला मिळालं आहे. मी आता स्वत:वर आणि कंटेंटवर काम करत आहे. भविष्यात तुम्हाला माझ्या कामातून हे दिसेल,” असा दावा त्याने केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे स्टँड-अप कॉमेडीमधील मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. Pranit More
हेही वाचा:
Sanjay Raut: बंगालमधील ईव्हीएमला भाजप सरकारकडून आग; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप






