“कायद्याच्या योग्य पद्धतीशी जुळवून घेतल्याशिवाय न्याय अपूर्ण” ; प्रकाश आंबेडकरांचे धक्कादायक विधान

Prakash Ambedklar on Badlapur Case । बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत. तर दुसरीकडे अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट सादर करावा Prakash Ambedklar on Badlapur Case ।
बदलापूरमध्ये त्या लहान मुलींसोबत घटना घडली, तेव्हा अगोदर आरोपींना शोधण्यात शिंदे फडणवीस सरकार कमी पडलं.
मदतनीस कसे मोकळे सुटतील याची काळजी घेतली गेली.आरोपीला दुसऱ्या केसमध्ये घेऊन जात असताना त्याने रिव्हॉल्व्हर हिसकून घेतले फायरींग केलं त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे, त्याच्यासोबत आमची सहानुभूती आहे. मात्र, शासनाने त्यांचा मेडिकल रिपोर्ट सादर करावा, त्याला कुठे गोळी लागली त्याची संपूर्ण माहिती द्यावी, त्यामुळे जी आता चर्चा सुरू आहे ती थांबेल, आता ज्या केसमध्ये आरोपीला घेऊन जात होते, त्याच्या बायकोच्या तक्रारीबाबत त्याला घेऊन जात होते, नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते त्याचा खुलासा करावा, असेही आंबेडकरांनी म्हटलं.
कायद्याच्या योग्य पद्धतीशी जुळवून घेतल्याशिवाय न्याय अपूर्ण Prakash Ambedklar on Badlapur Case ।
पुढे बोलताना त्यांनी,”कायद्याच्या योग्य पद्धतीशी जुळवून घेतल्याशिवाय न्याय अपूर्ण आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार हे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे पूर्ण अपयश आहे. आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात गोळी मारण्यात आली आहे. पण, आम्हाला आशा आहे की, आरोपीने ज्या पोलिसाला गोळ्या घातल्या होत्या, त्याचा वैद्यकीय अहवाल पोलीस लवकरच जाहीर करतील जेणेकरून हा कट होता की नाही ते स्पष्ट होईल. पोलिसांनी बदली नियमावलीचे पालन केले असते आणि संध्याकाळी 5 नंतर त्यांची बदली केली नसती तर ही संपूर्ण घटना टाळता आली असती” असेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय.





