“मनोज जरांगेंनी २८८ लढाव्यात, तर…” प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला

Prakash Ambedkar And Manoj Jarange | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी नगरात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले आहे. इतकेच काय तर आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात अशी अपेक्षा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मनोज जरांगे निवडणूक लढवणार अस म्हणत आहेत त्यांनी २८८ जागा लढवाव्यात ही आमची अपेक्षा आहे. लोकसभेत गरीब मराठा समाजाने श्रीमंत खासदारांना मतदान केले त्यामुळे हे खासदार निवडून आले. पण जरांगेनी गरीब उमेदवार उभा केले तर समाजाला न्याय मिळेल. हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरू असताना सामंजस्याची चर्चा झाली असती तर परिस्थिती चांगली राहिली असती. आता मात्र आगीत तेल पडले आहे.”
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षांना पत्र पाठवण्यात येणार होते. अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांचं पत्र आलेलं नाही ते कधी पाठवणार आहेत हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. Prakash Ambedkar And Manoj Jarange |
विशाळगडावरील घडलेल्या प्रकरणावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. “त्या ठिकाणी जे घडलं, संभाजी भीडे यांच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातली अशी आमची माहिती आहे. जाणून बुजून त्या ठिकाणच्या लोकांना मारहाण करण्यात आली. सरकारने यांची चौकशी करावी आणि त्यावर तोडगा काढावा,” अशी विनंती देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली. Prakash Ambedkar And Manoj Jarange |
हेही वाचा:
नाना पटोलेंच्या गळ्यात ‘भावी मुख्यमंत्री’ लिहिलेली वीणा ; भुजबळ-पवार यांच्या भेटीवर केले परखड भाष्य



