Prakash Ambedkar : पवार आणि शिंदेनी सावध रहावे; प्रकाश आंबेडकरांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडले. यामधून राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर टीका केली.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
कोणाचा परफॉर्मन्स चांगला झालाय हे मुख्यमंत्री यांनी सांगावे, काय नेमके बदल केले आहेत याच्या पलीकडे काय आहे, नवीन बदल काय आणि त्याने काय बदल घडवले आहेत? महिला बालविकासचे जर काही क्रेडिट असेल तर ते एकनाथ शिंदे यांना जाईल. कारण त्यांनी १५०० दिले त्यामुळे कंजूम पॉवर वाढली आहे असे प्रकाश आंबडेकर म्हणाले.
पवार आणि शिंदेना दिला सल्ला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे, नाही तर अजगर कधी गिळणार हे त्याना कळणार नाही असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर काय म्हणाले ?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं मला वाटतं. ही अस्तित्वाची लाढई आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर देखील निशाणा साधला आहे. दोन्ही पवार वेगळे नव्हते तेव्हाच सांगितले होते, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.





