प्रजनेश गुणेश्वरनची उपांत्य फेरीत धडक
Updated On:

कैरी (अमेरिका) – भारताचा टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरन याने एटीपी चॅलेंजर अटलांटिक टायर चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ब्राझीलच्या थॉमझ बेलुची याचा पराभव करत गुणेश्वरन याने स्पर्धेतील आगेकूच कायम ठेवली आहे.
डावखुऱ्या प्रजनेश गुणेश्वरन आणि थॉमझ बेल्युची यांच्यात संघर्षपूर्ण सामना रंगला. हा सामन गुणेश्वरन याने 3-6, 7-5, 7-6(5) अशा फरकाने जिंकला. 146 व्या रॅंकवर असलेल्या प्रजनेश याची पुढील लढत 198व्या रॅंकवर असलेल्या डेन्मार्कच्या मायकल त्रोपेगार्ड याच्याशी होणार आहे.
तत्पूर्वी, प्रजनेशने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तीन सेटपर्यत रंगलेल्या सामन्यात अमेरिकेच्या जॅक सॉकला पराभूत केले होते. ही लढत प्रजनेश याने 6-7 (3), 6-2, 7-6(5) अशी जिंकली. दरम्यान, भारताच्या रामकुमार रामनाथन याचे पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते.





