‘प्राजक्तकुंज’ला २ वर्ष पूर्ण; अभिनेत्रीचे खास सेलिब्रेशन

Prajakta Mali | प्राजक्ताने कर्जतमध्ये निसर्गाच्या कुशीत अलिशान फॉर्महाऊस घेतलं होत. ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर देखील सांगितले होते. तिच्या या फॉर्महाऊसला ‘प्राजक्तकुंज’ असे नाव देण्यात आले आहे. नुकतेच या फॉर्महाऊसला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त तिने खास सेलिब्रेशन केले आहे. ज्याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
प्राजक्ताने संपूर्ण परिवारासह प्राजक्तकुंज नावाचा केक कापून हे सेलीब्रेशन केलं आहे. व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘आम्हा संपूर्ण परिवाराला भेटण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही… हेच कारण आहे.’ Prajakta Mali |
View this post on Instagram
प्राजक्तकुंज या प्राजक्ताच्या फॉर्महाऊसवर राहण्याची उत्तम सोय आहे. येथे पिकनीक प्लान देखील करू शकता. प्राजक्ताच्या फॉर्महाऊसवर एक दिवस राहण्याचा खर्च १५ ते ३० हजार रूपये आहे. दरम्यान, प्राजक्ता माळीने ‘प्राजक्तराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँडही लाँच केला. त्यानंतर प्राजक्ताने नवं फार्म हाऊस खरेदी केल्याचे देखील सांगितले होते. ज्याची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. Prajakta Mali |
हेही वाचा
‘मोदीजींशी वैर नाही, पण नितीशजींची खैर नाही’ ; चिराग पासवान पुन्हा २०२० च्या भूमिकेत परतले?





