प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

Prajakta Mali | मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. नुकतेच प्राजक्ता माळीने पुण्यातील चित्रपटगृह हाऊसफूल झाल्याचं सांगत इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कृतज्ञ… फुलवंती..,सर्वत्र प्रदर्शित”. या चित्रपटात ‘फुलवंती’ची भूमिका प्राजक्ता माळी तर व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांची भूमिका गश्मीर महाजनी यांनी साकारली आहे. ‘फुलवंती’ हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ कादंबरीवर आधारित आहे. Prajakta Mali |
View this post on Instagram
View this post on Instagram
प्राजक्ता माळीने या चित्रपटात मुख्य भूमिकेत निर्मितीही केली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसह तिच्या अदांचे सर्वत्र तुफान कौतूक होत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केले आहे. तर चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. Prajakta Mali |
हेही वाचा:





