संतोष देशमुख प्रकरण : अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार?

Prajakta Mali on Suresh Dhas । सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना लक्ष्य करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचा नवीन आणि गंभीर आरोप केला आहे. सुरेश धस यांनी यासाठी सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दाखला देत मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. आता त्यांच्या याच उल्लेखावरून आज प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धनुभाऊ आपले विमान खाली आणा… Prajakta Mali on Suresh Dhas ।
सुरेश धस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, “आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे. आमच लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही”, असे विधान सुरेश धस यांनी केले होते. सुरेश धस यांच्या या विधानानंतर प्राजक्ता माळी याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार? Prajakta Mali on Suresh Dhas ।
महादेव ऍप प्रकरणाचे बीड कनेक्शन असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केला. बीड जिल्ह्यातील गायरान जमिनी गाळे बांधण्यासाठी हडपल्याचा आरोपही धस यांनी केला. तसेच बीडमध्ये होत असलेल्या सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दखल देत त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचे म्हटले आहे. सर्व विषयांवर बोलताना धस यांनी मात्र संपूर्ण प्रकरणामागे आकांचा हात असल्याचे आवर्जून सांगितले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार का हे पाहणे गरजेचे आहे.
वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी
सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सीआयडीचे पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.





