प्राजक्ता माळीने व्यक्त केला आनंद; म्हणाली ‘ज्या क्षणाची…’

Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीने अनेक मालिकांसह चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या उत्तम अभिनयाची छाप तिने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे. प्राजक्ताने निर्माती म्हणून तिच्या आगामी ‘फुलवंती’ सिनेमाची घोषणा केली. या चित्रपटाबाबत प्राजक्ता देखील फारच उत्सुक आहे.
सोशल मीडियावर ‘फुलवंती’ सिनेमाच्या सेटवरील काही क्षणांचे फोटो तिने शेअर केले आहेत. हा सिनेमा प्राजक्ताच्या मनाशी अत्यंत जवळचा असल्याने तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘ज्या क्षणाची मी गेलं पूर्ण वर्ष चातकासारखी वाट पाहत होते. तो क्षण.’ या पोस्टद्वारे ‘फुलवंती’चे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती तिने दिली. Prajakta Mali |
View this post on Instagram
पुढे तिने असे लिहिले की, ‘फुलवंती खरोखरच माझ्यासाठी खूप खास प्रोजेक्ट आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टसाठी मी माझा सर्वाधिक वेळ आणि लक्ष दिले आहे. तसेच या प्रोजेक्टने मला आयुष्यातील सखोल आणि शहाणपणाचे धडे दिले. मला प्रचंड शक्ती, स्वातंत्र्य दिले आणि मला एकप्रकारे योद्धा बनवले. प्राजक्ताने या पोस्टमधून तिला पाठिंबा देणाऱ्यांचे, मदत करणाऱ्यांचे, तिच्या गुरुंचे, सिनेमाची दिग्दर्शिका स्नेहल तरडे, लेखक प्रवीण तरडे आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांचेही आभार मानले आहेत. Prajakta Mali |
दरम्यान, अभिनेत्रीच्या ‘शिवोहम’ या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. मराठी साहित्यिक आणि नाटककार बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते. यात प्राजक्ता माळीसह कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
हेही वाचा:
“मनोज जरांगेंनी फडणवीसांचा पिच्छा सोडावा आणि बारामतीत…”; सदाभाऊ खोत यांचे आवाहन





