“मनोज जरांगेंनी फडणवीसांचा पिच्छा सोडावा आणि बारामतीत…”; सदाभाऊ खोत यांचे आवाहन

Sadabhau Khot On Manoj Jarange| मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मनोज जरांगे यांनी शांतता फेरी काढली होती. यानंतर आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी भाष्य करत मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. “मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पिच्छा सोडून आता शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
“महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाने राजकारण केले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्यांवर मतदान झालं. विरोधकांकडून सांगितले की भाजप आरक्षणाला विरोध करत आहे. आता विरोधकांनी लेखी द्यावं की आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. Sadabhau Khot On Manoj Jarange|
“ओबीसींचं आरक्षण कोणालाही जाणार नाही. मराठा समाजाला सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ते सरकारने टिकवावं आणि तेच आरक्षण मराठा समाजाला भविष्यात कायम राहू शकते. कोणतंही सरकार सत्तेत आलेलं तरी कोणाच्याही आरक्षणामध्ये दुसऱ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही”, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटले. Sadabhau Khot On Manoj Jarange|
“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, असं शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने जाहीर करावं. ते जर तसं जाहीर करणार नसतील तर मी मनोज जरांगे यांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आणि भाजपाचा पिच्छा त्यांनी सोडावा आणि बारामतीच्या दिशेने तुमचा मोर्चा वळवावा”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. Sadabhau Khot On Manoj Jarange|
हेही वाचा:





