प्राजक्ता माळीने नावात केला बदल; इनस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

Prajakta Mali New Post| मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. प्राजक्ता सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. याशिवाय ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती देखील चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सध्या तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. नव्या पोस्टमध्ये प्राजक्ताने तिच्या नावात बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तिच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचे संपूर्ण नाव ‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ असं जाहीर केलं आणि सोबत पोस्टमध्ये लिहिले की, “नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे, अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे.” Prajakta Mali New Post|
पुढे तिने लिहिले की, “आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री “अदिती वरदा सुनील तटकरे “ ताई यांनी आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट….” Prajakta Mali New Post|
View this post on Instagram
प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी त्यांना निर्णय पसंत पडला नाही असं म्हंटल. काहींनी प्राजक्ताचं अनुकरण करत स्वतःच्या आईचं नावसुद्धा संपूर्ण नावात जोडलं. दरम्यान, प्राजक्ताने मालिकांनसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. लवकरच ती ‘भिशी मित्रमंडळ’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे.
हेही वाचा:
‘जेल का जवाब वोट से’ ; ‘आप’ने अरविंद केजरीवालांच्या अटकेला बनवलं निवडणुकीचं कॅम्पेन





