औरंगजेबाचे कौतुक करणं पडलं महागात; राहुल नार्वेकरांंना पत्र लिहीत अबू आझमींनी केली ‘ही’ विनंती

Abu Azmi | समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे कौतुक करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानभवनाच्या आवारात येण्याची देखील बंदी घालण्यात आली आहे. यानंतर आता त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे.
अबू आझमी यांनी पत्रात म्हंटले की, “मी जे काही बोललो ते इतिहासकार आणि लेखकांच्या अभ्यासावर आधारित होते. औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माचा कोणताही संघर्ष नव्हता. तो सत्तेसाठीचा, जमिनीसाठीचा लढा होता. मी जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. मी कुठेही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. माझे विधान माध्यमांमध्ये चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले, म्हणूनच मी माझे निलंबन मागे घेण्याची विनंती करतो.’ Abu Azmi |
Maharashtra Samajwadi Party President Abu Azmi wrote to Maharashtra Speaker Rahul Narwekar to revoke his suspension
He wrote, “My statement was taken out of context. Everything I said was actually based on quotes of many other Historians and writers. I did not make any…
— ANI (@ANI) March 8, 2025
विधिमंडळात गोंधळ
दरम्यान, अबू आझमी यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळात गोंधळ घालत कामकाज बंद पाडले होते. विधानसभेत यावरून जोरदार गदारोळ करत घोषणाबाजी देखील करण्यात आली. ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता’ हे आझमींचे वक्तव्य अतिशय गंभीर असून त्यांचे सदस्यत्व अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांना या कालावधीत विधानभवन आवारात प्रवेशबंदी करण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. Abu Azmi |
काय म्हणाले होते अबू आझमी ?
अबू आझमी यांनी औरंगजेबचे कौतुक केले होते. “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याने अनेक मंदिरं बांधली होती. तो उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती, देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे,” असे वक्तव्य आझमी यांनी केले होते.
हेही वाचा:
दिल्लीतील लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार 2500 रुपये? महिला दिनी मोठी घोषणा होण्याची शक्यता




