Pragya Singh Thakur : मालेगाव बॉम्ब स्फोटात निर्दोष मुक्तता ! कोण आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर?

Who is Pragya Singh Thakur | मालेगाव बॉम्ब स्फोटाचा निकाल तब्बल १७ वर्षानंतर लागला आहे. NIA कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर यावर राजकीय नेतेमंडळीच्या देखील प्रतिक्रिया समोर येत आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांची आज विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे बालपण मध्यप्रदेशच्या चंबलमध्ये गेले. त्यांचे वडील आरएसएसचे स्वयंसेवक होते आणि पेशाने डॉक्टर होते. आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत देखील त्या सक्रिय होत्या. आरएसएस आणि अखिल भारतीय हिंदू परिषदेमध्ये त्यांनी सक्रिय काम केले. 29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात ATS ने त्यांना सर्वप्रथम अटक केली होती.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर काय आरोप होता?
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आरोप होता. या स्फोटासाठी वापरलेली मोटारसायकल त्यांच्या नावावर होती. बॉम्बस्फोटाच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ATS ने त्यांच्यावर कट रचण्याच्या बैठका घेतल्याचा आणि योजना आखण्यासाठी आवश्यक व्यक्ती उपलब्ध करून देण्याची सहमती दर्शवल्याचा आरोप केला. सध्या त्या जामीनावर बाहेर असून त्या भाजपच्या खासदार होत्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरसह सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
राजकारणात प्रवेश कसा झाला?
2019 मध्ये प्रज्ञा सिंह ठाकुर यांना भाजपने भोपाळमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार बनवले. त्यावेळी त्यांच्यावर आरोप होते. त्यांनी भोपाळमधून काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध निवडणूक जिंकली. संसदीय कार्यकाळादरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांचे खूनी नाथूराम गोडसे यांना ‘देशभक्त’ म्हटल्याने वाद निर्माण झाला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, ते त्यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाहीत.
प्रज्ञा ठाकुर यांना अटक झाली, तेव्हा स्वर्गीय ATS प्रमुख हेमंत करकरे हे प्रकरणाची चौकशी करत होते. त्यांनी दावा केला की, हेमंत करकरे यांचा मृत्यू त्यांनी दिलेल्या शापामुळे झाला. हेमंत करकरे यांची हत्या 2011 मध्ये मुंबईतील पाकिस्तानी हल्ल्यादरम्यान झाली होती. साध्वी प्रज्ञा ठाकुर यांना 2024 मध्ये भाजपने तिकीट दिले नाही, परंतु त्या आजही भाजपच्या सदस्या आहेत.
‘या’ सातही आरोपींची निर्दोष मुक्तता
दरम्यान, प्रज्ञा ठाकुर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या सातही आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.





