प्रफुल्ल पटेल यांनी केलं मतदान ; म्हणाले,”महायुतीचे सत्तेवर येणार…”

Praful Patel voted । मागच्या एका महिन्यापासून राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तर आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून यावेळच्या मतदानाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार ) चे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. याविषयी बोलताना, “महाराष्ट्रात महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी केलेल्या कामामुळेच आमची महायुतीच सत्तेवर येणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे… जे लोक निराश झाले आहेत आणि ज्यांना माहित आहे की ते जात आहेत. इतरांवर आरोप करत आहेत . असेही त्यांनी यावेळी म्हटले.
#WATCH | NCP leader Praful Patel says “Mahayuti is going to come to power in Maharashtra because of the work we have done for women, farmers and youth. Maharashtra is getting huge investments…The people who are frustrated and who know that they are going to lose keep making… https://t.co/neJZcUPSf2 pic.twitter.com/NopC21MIkw
— ANI (@ANI) November 20, 2024
दरम्यान ,राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचं दिसून आले.





