रणवीर सिंगच्या ‘पद्मावत’ चित्रपटाची प्रभासने नाकारली होती ऑफर

Bollywood | दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट सुपरहिट ठरला. यात अभिनेता रणवीर सिंह मुख्यभूमिकेत पाहायला मिळाला. याशिवाय यात रतन सिंह यांच्या भूमिकेत अभिनेता शाहिद कपूरने उत्तम काम केले होते. परंतु या भूमिकेसाठी शाहिद कपूर पहिली पसंती नव्हती तर यासाठी प्रभासला कास्ट करण्यात आले होते. पण प्रभासने या चित्रपटात काम करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता.
‘बाहुबली’ चित्रपटातील प्रभासच्या अभिनयानं भन्साळी खूपच प्रभावित झाले होते. त्यामुळे त्याला या चित्रपटाची ऑफर दिली होती. जेव्हा प्रभासला पद्मावत चित्रपट ऑफर करण्यात आला, तेव्हा तो बाहुबलीच्या सिक्वेलची तयारी करत होता. प्रभासला भन्साळींसारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायचे होते, पण त्याला रणवीर आणि दीपिकासारखी महत्त्वाची भूमिका हवी होती. त्याला रतन सिंगची भूमिका आवडली नाही आणि प्रभासनं या चित्रपटासाठी नकार दिला, त्यानंतर भन्साळींनी शाहिद कपूरला हा चित्रपट ऑफर केला. Bollywood |
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूरसह अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं. या चित्रपटातील गाणी, भव्य सेट आणि कलाकरांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
हेही वाचा:





