Nevasa News : साखर उद्योगातील योगदाबद्दल प्रभाकर शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार

नेवासा : साखर उद्योगातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम व तांत्रिक उत्कर्षासाठी पंचगंगा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रभाकर (काका) शिंदे यांना शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, इंडिया यांचा नवी दिल्ली येथे देशपातळीवरील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार (लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड) प्रदान करण्यात आला.
शुक्रवारी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या एका समारंभात या पुरस्काराचे वितरण झाले. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व दि शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे प्रेसिडेंट संजय अवस्थी यांच्या हस्ते शिंदे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रभाकराव (काका)शिंदे यांनी पंचगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध तांत्रिक व आर्थिक उपक्रम राबविले देशविदेशातील साखर तंत्रज्ञानाचा अभ्यास करून कारखानदारीत यशस्वी पाऊल टाकले कारखाना आधुनिकीकरण केले पंचगंगा समुहात तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांच्या बांधावर नव्या सुविधा पोहोचवल्या.
यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, रणजीत पुरी, एन. चिन्नप्पन, पंचगंगा उद्योग समुहाचे प्रमोद शिंदे यांच्यासह साखर इंड्रस्टीज मधील प्रमुख मंडळी उपस्थित होते. साखर उद्योगातील या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळ शिंदे यांचे विशेषतःआहिल्यानगर व संभाजीनगर जिल्ह्यातील परिसरातुन अभिनदंन करण्यात येत आहे.





