प्रभासच्या ‘द राजा साब’चे दमदार पोस्टर रिलीज; हटके लुकने वेधले लक्ष

The Raja Saab Poster Out | अभिनेता प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर आता त्याचा आगामी ‘द राजा साब’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रभासच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. सोबतच चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.
अभिनेता प्रभासने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘साहसाची वेळ आली आहे. १० एप्रिल, २०२५ला सिनेमागृहात भेटूयात.’ या पोस्टरमध्ये प्रभासचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. यात अभिनेता सिंहासनावर रॉयल अंदाजात पाहायला मिळत आहे. यात तो आक्रमक दिसत आहे. The Raja Saab Poster Out |
दाढी, वाढलेले केस आणि राजासारखा दिसणारा प्रभास एका झपाटलेल्या हवेलीत सिंहासनावर बसलेला दिसतो. सिगारेट ओढताना तो अत्यंत गंभीर लूकमध्ये दिसत आहे. ‘द राजा साब’च्या या पोस्टरमध्ये प्रभास आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या गेटअपमध्ये दिसत आहे. हे पोस्टर रिलीज होताच व्हायरल झाले असून या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. The Raja Saab Poster Out |
Royal by blood……
Rebel by choice….
Claiming what was always his! 🔥🔥Motion Poster out now.https://t.co/v1dhha0Wxa#HappyBirthdayPrabhas ❤️#Prabhas #TheRajaSaab pic.twitter.com/cZyLxeRNez
— The RajaSaab (@rajasaabmovie) October 23, 2024
‘द राजा साब’ 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळते. ‘द राजा साब’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट असून प्रभास पहिल्यांदाच कॉमेडी करताना दिसणार आहे. या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या जॉली ‘एलएलबी 3’ या चित्रपटाशी होणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर प्रभास शेवटचा ‘कल्की 2898 एडी’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाच्या यशानंतर आता याचा सिक्वेलही येणार आहे.
हेही वाचा:
यूपी पोटनिवडणूक: अखिलेश यादव यांनी भारत युती तोडण्याच्या अटकळांना पूर्णविराम दिला





