संतांच्या विचाराने अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य

खर्डा – दैनंदिन जीवनात संतांचे विचार आचरणात आणले तर कोणतेही संकट या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य आपोआप निर्माण होते.त्यामुळेच संतांचे विचार श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन हभप कृष्णा महाराज जायभाय भगवानगडकर यांनी केले.
खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील नागोबाची वाडी येथील तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचे नागोबा मंदिर आहे. या देवस्थानची दोन दिवस यात्रा भरते. याप्रसंगी नागोबाची वाडी येथील ग्रामस्थ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. यावर्षी हभप कृष्णा महाराज जायभाय यांनी कीर्तनातून जमलेल्या भाविकांनी उपदेश केला.
या कार्यक्रमासाठी भगवानगडाचे महंत हभप नामदेव शास्त्री महाराज यांना नागोबावाडी ग्रामस्थाने निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी ही विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. त्यांचा नागोबावाडी व पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने भव्य सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ते म्हणाले तुमचे अतुट प्रेमाने व संत भगवान बाबांच्या कृपेने मी समाधानी आहे. भगवान गडावर थोड्याच दिवसात संत ज्ञानेश्वर महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे असे सांगताच नागोबावाडी ग्रामस्थांनी मंदिरासाठी ६६ लाख रुपये बांधकामासाठी देण्याचा शब्द दिला. शास्त्री म्हणाले मी ६६ व्या वर्षात पदार्पण करत आहे, हा योगायोग आहे .
संत भगवानबाबा नामघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच संजय गोपाळघरे, आसाराम गोपाळघरे, एकनाथ गोपाळघरे, दत्तात्रय गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, परशुराम गिते, हनुमंत बारगजे, तुळशीदास गोपाळघरे, डॉ.सोपान गोपाळघरे, डॉ, अंकुश गोपाळघरे, शिवाजी गोपाळघरे सर्व नागोबावाडी ग्रामस्थ उपस्थित होते.





