Pimpri : ग्रेडसेपरेटर रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघाताचा धोका

पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सिमेंटर क्रॉकीटच्या ग्रेडसेपरेटर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातांचे कारण ठरत असून त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाचे शहर सचिव यल्लाप्पा वालदोर यांनी दिले आहे.
या संदर्भात महापालिका प्रशासनाला दिेलेल्या निवेदनात वालदोर यांनी म्हटले आहे की, या सिमेंट रस्त्यावर चिरा आणि खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यातून जाताना दुचाकी वाहने अडकतात. वाहने घसरून पडण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते. कासारवाडीजवळ ही बाब लक्षात येताच तो रस्ता बंद करण्यात आला.
जेणेकरून खड्ड्यातून गाडी जाऊ नये आणि अपघात होऊ नये. महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालय आणि बीआरटी विभागाने तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास या खड्ड्यांमुळे होणार्या दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.





