महायुतीतील नाराजी नाट्यानंतर ‘या’ दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती; राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Politics | महायुती सरकारने मोठ्या प्रतिक्षेनंतर शनिवारी रात्री पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. मात्र काही मंत्र्यांना पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याप्रकरणी काही मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला.
यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून देखील नाराजी नाट्य सुरू असल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. 19 जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती
पालकमंत्री पदावरून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद सुरु आहे. अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले.
तर, रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगवले नाराज झाले. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. तसेच रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना दिल्याचा निषेध देखील व्यक्त केला होता. Maharashtra Politics |
रायगडमधील शिवसैनिक संतप्त
पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गावर महाड जवळ शनिवारी रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली. Maharashtra Politics |
तर पालकमंत्रिपदावरून डावलल्याच्या चर्चांवर दादा भुसेंनी या चर्चांना काहीही अर्थ नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधी चर्चा केली होती. तर पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणं हे कार्यकर्त्यांचं काम असल्याचे म्हंटले होते. दरम्यान, पालकमंत्री पदावरून डावल्यानंतर भरत गोगावले आणि दादा भूसे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.
हेही वाचा:
गोल्डन बॉय नीरज चोप्राने केलं लग्न, फोटो शेअर करत पत्नीचे नावही सांगितले





