Neeraj Chopra Wedding: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. नीरजने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच सुखद धक्का दिला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोसोबतच, नीरजने त्याच्या पत्नीचे नाव देखील सांगितले. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नीरजच्या पत्नीचे नाव हिमानी आहे. याआधी नीरजने कधीही तिचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्यास सर्वचजण उत्सुक आहेत. लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर आता सोशल मीडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जीवन के नए अध्याय की शुरुआत अपने परिवार के साथ की। 🙏
Grateful for every blessing that brought us to this moment together. Bound by love, happily ever after.
नीरज ♥️ हिमानी pic.twitter.com/OU9RM5w2o8
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) January 19, 2025
नीरजने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले की, जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात माझ्या कुटुंबासह केली. या क्षणासाठी आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ आहे. कायमस्वरुपी प्रेमाने बांधले गेलो आहोत. सोबतच, त्याने त्याच्या पत्नीचे नाव देखील सांगितले.
कोण आहे हिमानी मोर?
रिपोर्टनुसार, हिमानी एक टेनिसपटू आहे. तिने साउथइस्टर्न लुइसियाना यूनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केले आहे. तिने फ्रँकलिन प्रायर युनिव्हर्सिटीमध्ये स्वयंसेवक सहाय्यक टेनिस प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. ॲमहर्स्ट कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट असिस्टेंट म्हणून काम करतानाच, कॉलेजच्या महिला टेनिस टीमचे व्यवस्थापन करते. हिमानी मॅककॉर्मेक इसेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
नीरजबद्दल सांगायचे तर त्याने भारताला सलग दोन ऑल्मिपिकमध्ये पदकं मिळवून दिली आहेत. भालाफेकमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि पॅरिस ऑल्मिपिकमध्ये रौप्य पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी त्याने केली आहे.