Nasrapur case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर एका 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिची निर्घूणपणे हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ नवले पूल परिसरात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आश्वासन दिले होते. आता या प्रकरणातील पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यातील तपशील अत्यंत धक्कादायक आहेत. अहवालानुसार, मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची निर्दयपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालात नमूद केल्याप्रमाणे, मुलीच्या तोंडात पाय मोजा कोंबण्यात आला होता. तसेच छातीवर वळ असल्याचे आढळून आले आहेत. ससून रुग्णालयाने प्राथमिक अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे. या अहवालानंतर नागरिकांमध्ये आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. Nasrapur Case सध्या पोलिसांकडून आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल. आरोपीची वैद्यकीय तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे नाव भीमराव कांबळे असे आहे. नेमंक काय घडलं होतं? साडेतीन वर्षांची चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजोळी आली असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरू दाखवण्याचा बहाणा करून नेले आणि तिथेच तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. संबंधित आरोपीवर यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर या घटनेनंतर आरोपीच्या पत्नीचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. “त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला त्याचं तोंडही पाहायचं नाही, गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्याशी कोणताही संबंध नसून अनेकदा त्याला सुधारणेचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही,” अशी प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवरही टीका होत असून, लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे. हेही वाचा : Priyanka Chopra: “साऊथपासून हॉलीवूडपर्यंतचा प्रवास; प्रियंका चोप्राची कमाई आज शेकडो कोटींच्या घरात!”