“नव्या युगातील रावण, जुमला बॉय, दि बिगेस्ट लायर” ! भाजप आणि कॉंग्रेसमध्ये रंगले पोस्टर वॉर

नवी दिल्ली – निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून राजकारण तापणार असल्याची झलक भाजप (bjp) आणि कॉंग्रेस (congress) या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी गुरूवारी दाखवली. त्या पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार पोस्टर वॉर (poster war) रंगले. परस्परांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी नव्या युगातील रावण, जुमला बॉय आणि दि बिगेस्ट लायर यांसारख्या विशेषणांची उधळण केली.
कॉंग्रेसने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावरून टीकास्त्र सोडले. त्यावेळी त्यांचा उल्लेख दि बिगेस्ट लायर (सर्वांत मोठा खोटारडा) आणि जुमला बॉय असा करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने सोशल मीडियावरून एक पोस्टर प्रसिद्ध केले. त्यामध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख न्यु एज रावण (नव्या युगातील रावण) असा करण्यात आला. पोस्टरमध्ये राहुल यांना रावणाच्या रूपात दाखवण्यात आले. रावणाप्रमाणे राहुल यांना अनेक डोकी लावण्यात आली. त्या पोस्टरवर भारत खतरें में है- अ कॉंग्रेस पार्टी प्रॉडक्शन, डायरेक्टेड बाय जॉर्ज सोरोस असे शीर्षक देण्यात आले. नव्या युगातील रावण दुष्ट, धर्मविरोधी आणि भगवान रामविरोधी आहे. भारताला उद्धवस्त करण्याचा त्याचा उद्देश आहे, अशी टिप्पणीही भाजपने केली.(bjp vs congress poster war)
भाजपचे पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले. त्यामध्ये मोदींना दानवाच्या रूपात दर्शवण्यात आले. हिंदुस्थान खतरें में है- मोदानव, अ भ्रष्ट जुमलेबाज पार्टी प्रॉडक्शन, डायरेक्टेड बाय परममित्र अदानी असे शीर्षक पोस्टरला देण्यात आले. नव्या युगातील मोदानव. तो दुष्ट, लोकशाहीविरोधी, घटनाविरोधी, जनताविरोधी आहे. भारताला आणि इंडियाच्या संकल्पनेला उद्धवस्त करणे हाच त्याचा एकमेव उद्देश आहे, अशी टिप्पणी पोस्टरमध्ये करण्यात आली. (rahul gandhi modi poster)
The new age MODANAV is here. He is Evil. Anti Democracy. Anti Constitution. Anti People. Anti Humanity.
His only aim is to destroy Bharat & the idea of INDIA. https://t.co/eEXAOWtlaY pic.twitter.com/xaTYJ59qxl
— Srinivas BV (@srinivasiyc) October 5, 2023
भाजपच्या पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आलेले जॉर्ज सोरोस हे अमेरिकी गुंतवणूकदार आहेत. त्यांनी काही मुद्द्यांवरून मोदींवर टीका केली होती. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेत सोरोस यांचे काही निकटवर्तीय सहभागी झाल्याचा दावा भाजपने याआधी केला होता. तर, कॉंग्रेसच्या पोस्टरमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांचा उल्लेख परममित्र म्हणून करण्यात आला आहे.





