Amitabh Bachchan | अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. त्यांच्या प्रोजेक्टबाबतचे अनेक अपडेट ते सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांचे अनेक ट्वीट चर्चेत राहिले आहेत. आता देखील बिग बींनी केलेल्या एका ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिग बींनी फॉलोवर्सची संख्या कशी वाढवायची याबद्दल चाहत्यांना प्रश्न विचारला. त्यावर नेटकऱ्यांनी देखील विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक्स अकाऊंटवरील फॉलोवर्स वाढत नसल्याने बिग बींना चिंता खूप प्रयत्न करूनही बिग बींचे एक्स अकाऊंटवरील फॉलोवर्स वाढत नसल्याने त्यांना चिंता सतावत आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलं आहे. त्यांचे X अकाऊंटवर ४९ मिलियन फॉलोवर्स आहेत. पण, ही संख्या वाढत नाही. त्यामुळे फॉलोवर्स वाढवण्यासाठी काही उपाय असतील तर सांगा असं बिग बींनी चाहत्यांना म्हटलं आहे. “खूप प्रयत्न करत आहे. पण, ४९ मिलियन फॉलोवर्सची संख्या वाढतच नाही. काही उपाय असेल तर सांगा”, असं बिग बींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यावर एका नेटकऱ्याने ‘रेखाजींसोबतचा सेल्फी पोस्ट करून पहा’, असं लिहिलं. ‘जया बच्चन यांना घटस्फोट द्या, त्यांच्यामुळेच लोक तुम्हाला फॉलो करत नाहीयेत’, असं दुसऱ्याने म्हटले आहे. तर आणखी एकाने ‘सर, जयाजींसोबतच्या भांडणाचा व्हिडीओ पोस्ट करा, फॉलोअर्स वाढतील पहा’, असंही म्हटलं आहे. Amitabh Bachchan | आमिताभ यांच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, मागील वर्षी ते रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टियन’ चित्रपटात दिसले होते. याशिवाय ते कल्की 2898 ADमध्ये देखील दिसले होते. ते ‘ब्रह्मास्त्र 2’ आणि ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्येही दिसणार आहेत. Amitabh Bachchan |