सकारात्मक विचार हेच यशाचं गमक – कृष्णकुमार गोयल

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक विचार असले पाहीजे. मोठया स्वप्नांच्या पुर्तीसाठी प्रयत्नांचं सातत्य आणि सकारात्मकता याच्या जोरावर कुठलाही व्यक्ती आयुष्यात यशस्वी होवू शकतो. ग्रीन वर्ल्ड ने युवा संवाद चर्चासत्रातून तरूणांशी सुरू केलेली ही संवादयात्रा महाराष्ट्रात अनेक नवीन उद्योजक घडवतील असा विश्वास त्यांनी ग्रीन वर्ल्ड अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र व ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार वितरण सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उज्ज्वल चव्हाण हे याप्रसंगी म्हणाले प्रत्येक माणसापुढे प्रकाशातून प्रकाशाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, आणि प्रकाशातून अंधाराकडे मार्ग असतो. जो योग्य मार्गाची निवड करतो तो निश्चित यशस्वी होतो. स्वप्नांना कष्टाची व कल्पकतेची जोड फार आवश्यक असते. संस्थेचे अध्यक्ष गौतम कोतवाल म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्रभर तरूणांशी संवाद व्हावा, त्यांच्यात उद्योजकतेचं बीज पेरलं जावं म्हणून सुरू केलेल्या या युवा संवाद चर्चासत्राच्या अभियानात अनेक उद्योजकांचा व अधिकार्यांचा संवाद आम्ही घडवून आणणार आहे. संपुर्ण वर्षभर अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
खेड तालुक्याचे प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब सांडभोर, मलिका मिश्रा, लायन्स क्लबचे माजी गव्हर्नर सीए अभय शास्त्री, शेअर मार्केटतज्ज्ञ व ट्रेनर तुषार भुमकर, आरएमसी क्षेत्रातील समर्थ ग्रुपचे मालक रणजित वाळुंजकर-पाटील यांना अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. तर अर्जुन कान्हुरकर, सुरेश वाबळे, शांताराम वाकचौरे, राजाराम सातपुते, रमेश करंजावणे, अॅड. किरण मगर, डॉ. अनुराधा देशपांडे, भागवत थेटे, डॉ. माधुरी आल्हाट, मनोहर पालन, कयाधू सोळंके, अश्विनी यजुर्वेदी, जागृती कुलकर्णी, केशव आर्दड, काळुराम पवार, डॉ. शोभा इंगवले, सई वाडकर, प्रसन्न जोशी, छाया पैठणकर, प्रा. राजेश घुगे यांना ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमध्ये आयांजित केलेल्या या दिमाखदार सोहळयात अनेक विद्यार्थ्यांनी व तरूणांनी आपला सहभाग नोंदवला.





