हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची निवड

पुणे: हिंदू समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि सामाजिक संघटनबांधणीसाठी अखंड कार्यरत असलेल्या हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या समितीच्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. समितीचे अखिल भारतीय संयोजक गुणवंतसिंग कोठारी आणि पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले यांची या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
समितीचे महामंत्री किशोर येनपुरे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानुसार खालीलप्रमाणे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले:
उपाध्यक्ष: पंडित शिवकुमार शास्त्री
संयोजक: किशोर येनपुरे
सहसंयोजक: अॅड. संदीप सारडा
मठ-मंदिर उपाध्यक्ष: संजय भोसले
प्रशासकीय संस्था उपाध्यक्ष: सीए राधेश्याम अगरवाल, चरणजीतसिंग सहानी
कार्यालय प्रमुख: योगेश भोसले
कोषाध्यक्ष (कॉर्पोरेट): नितीन पाटणकर, संजय गांधी, नितीन पैलवान, गुरुबक्षसिंह मखेजा
कोष कॉर्पोरेट मार्गदर्शक: प्रल्हाद राठी
दस्तावेजीकरण: प्रकाश ढगे, उदय कुलकर्णी
जाती समूह प्रमुख: सिद्धेश कांबळे, राजन बाबू
प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क: सीए डॉ. केतन जोगळेकर, कुंदन साठे, संतोष डिंबळे, सीए सुनील सुरतवाला, राजेश मेहता
महिला सहभागाला प्रोत्साहन देत मातृशक्ती विभागाची जबाबदारी अॅड. कीर्ती कोल्हटकर, अनुपमा दरक, विद्या घाणेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, मार्गदर्शक मंडळात महेश सूर्यवंशी, राजेंद्र भाटिया, सुभाष परमार आणि सुनंदा राठी यांची निवड झाली आहे.
एकूण ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या नव्या कार्यकारिणीमुळे समितीच्या कार्याला नवीन दिशा आणि गती प्राप्त होईल, असा विश्वास सभेत व्यक्त करण्यात आला. हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात नव्या उपक्रमांना चालना देण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.





